Tuesday, September 22

West Bengal

रेजीनगर पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; पारंपरिक चिन्ह न मिळाल्याने RSP उमेदवाराची माघार
East Zone, Politics, West Bengal

रेजीनगर पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; पारंपरिक चिन्ह न मिळाल्याने RSP उमेदवाराची माघार

‘कुदळ-फावडे’ऐवजी ‘बादली’ चिन्हावर लढण्याची सूचना; निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप, न्यायालयात जाण्याची तयारी कोलकाता, २२ सप्टेंबर :(SDNA) पश्चिम बंगालमधील रेजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला मतदान होण्यापूर्वीच राजकीय वादाचे नवे वळण मिळाले आहे. डाव्या आघाडीतील घटक पक्ष रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (RSP) ने आपल्या उमेदवाराची उमेदवारी मागे घेतली आहे. पक्षाच्या पारंपरिक ‘कुदळ आणि फावडे’ या निवडणूक चिन्हाला परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप RSP ने केला आहे. रेजीनगर मतदारसंघात ६ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. RSP ने विकासचंद्र मिश्रा यांना उमेदवारी दिली होती आणि त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. मात्र, उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर पक्षाला त्याच्या पारंपरिक चिन्हाऐवजी ‘बादली’ हे चिन्ह वापरण्याची सूचना देण्यात आल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. ‘तांत्रिक कारण सांगून चिन्ह नाका...