म्यानमार दहशतवादी प्रशिक्षण प्रकरणात अमेरिकी नागरिकाला जामीन; 6 युक्रेनियन नागरिकांबाबत न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
राऊज अव्हेन्यू न्यायालयाचा निर्णय; जामिनासाठी अर्ज केल्यास सहा युक्रेनियन नागरिकांनाही कायदेशीर दिलासा मिळू शकतो
नवी दिल्ली : (सद्वार्ता) म्यानमारमधील कथित प्रशिक्षण शिबिराशी संबंधित प्रकरणात दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयाने अमेरिकी नागरिक मॅथ्यू आरोन वॅनडाइक याला डिफॉल्ट जामीन मंजूर केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दाखल केलेल्या प्रकरणात वॅनडाइकला एक लाख रुपयांच्या वैयक्तिक बाँड आणि तितक्याच रकमेच्या जामीन हमीवर जामीन देण्यात आला. न्यायालयाने त्याला दिल्लीमध्येच राहण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील सहा युक्रेनियन नागरिकांबाबतही न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.
सहा युक्रेनियन नागरिकांनाही जामिनाचा अधिकार
न्यायालयाने स्पष्ट केले की, सहा युक्रेनियन नागरिकांनी जामिनासाठी अर्ज दाखल केल्यास त्यांनाही जामीन मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र तपास अधिक...



