501 किमीची दमदार रेंज आणि आधुनिक फीचर्ससह BYD Atto 2 लॉन्च; किंमत 10 लाखांपेक्षा कमी!
नवी दिल्ली। इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर BYD ने आपली कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर 2027 Yuan UP Feichi Edition चीनच्या बाजारात लॉन्च केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ही कार BYD Atto 2 या नावाने ओळखली जाते. नव्या मॉडेलमध्ये 501 किमीपर्यंतची CLTC रेंज, अपडेटेड इंटीरियर आणि अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 74,800 युआन असल्याचे सांगितले जात असून, भारतीय चलनानुसार ती सुमारे 9.35 लाख रुपयांच्या आसपास आहे.
पाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध
नवीन BYD Atto 2 पाच व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे. बेस 301 KM Leading व्हेरिएंटची किंमत 74,800 युआन म्हणजेच सुमारे 9.35 लाख रुपये आहे. ट्रेड-इन ऑफरनंतर ही किंमत सुमारे 8.72 लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जाते.
401 KM Leading व्हेरिएंटची अंदाजे किंमत 10.22 लाख रुपये, तर 401 KM Vitality ची किंमत सुमा...
