Saturday, October 10

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत बदल; काशी-गयाऐवजी रामेश्वरमची यात्रा

इंदूर, ३० सप्टेंबर। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना २०२६-२७ च्या फेस-२ अंतर्गत नियोजित तीर्थयात्रेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. इंदूरसह बडवानी, अलीराजपूर, देवास आणि उज्जैन जिल्ह्यातील यात्रेकरूंसाठी पूर्वी ४ ते ९ ऑक्टोबर २०२६दरम्यान वाराणसी (काशी)-गया यात्रा प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र अपरिहार्य कारणांमुळे या कार्यक्रमात फेरबदल करण्यात आला आहे.

नवीन वेळापत्रकानुसार आता या जिल्ह्यांतील यात्रेकरूंना रामेश्वरम तीर्थक्षेत्राची यात्रा घडवून आणली जाणार आहे. यात्रेचा प्रारंभ २ डिसेंबर २०२६ रोजी इंदूर येथून, तर परतीचा प्रवास ७ डिसेंबर २०२६ रोजी निश्चित करण्यात आला आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, यात्रेच्या इतर व्यवस्थांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. संबंधित जिल्हा प्रशासनाला नव्या वेळापत्रकानुसार आवश्यक नियोजन आणि तयारी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

(SDNA)

Leave a Reply