
नवी दिल्ली | २४ सप्टेंबर
ऑडिओ क्षेत्रातील प्रसिद्ध ब्रँड सेनहायझरने भारतीय बाजारपेठेत दोन नवीन उत्पादने सादर केली आहेत. कंपनीने MOMENTUM 5 Wireless हेडफोन आणि MOMENTUM True Wireless 5 ईअरबड्स लॉन्च केले आहेत. या दोन्ही उत्पादनांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची बॅटरी वापरकर्त्याला स्वतः बदलता येणार आहे. दोन्ही उत्पादनांची प्री-ऑर्डर २४ सप्टेंबरपासून सुरू झाली असून, १ ऑक्टोबरपासून नियमित विक्री सुरू होणार आहे.
MOMENTUM 5 Wireless हेडफोनची किंमत ₹३९,९९०, तर MOMENTUM True Wireless 5 ईअरबड्सची किंमत ₹२९,९९० ठेवण्यात आली आहे. प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना कंपनीकडून ₹५,९९० किमतीचा Sennheiser BTD 600 Bluetooth USB डोंगल मोफत दिला जाणार आहे. हे उत्पादन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह प्रमुख ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि ऑफलाइन स्टोअर्सवर उपलब्ध होणार आहे.
42mm ड्रायव्हर्ससह MOMENTUM 5 Wireless
MOMENTUM 5 Wireless हेडफोनमध्ये 42mm ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. हे हेडफोन Hi-Res Audio प्रमाणित असून aptX Lossless, Snapdragon Sound, Dolby Atmos Spatial Audio आणि Interactive Head Tracking यांसारख्या सुविधांना सपोर्ट करतात.
नॉइज कॅन्सलेशन आणि कॉलिंगसाठी 8-मायक्रोफोन हायब्रिड ANC सिस्टम देण्यात आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ANC सुरू असताना हेडफोनची बॅटरी ५७ तासांपर्यंत चालू शकते. विशेष म्हणजे छोट्या स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने बॅटरी काही मिनिटांत स्वतः बदलता येते.
हेडफोनमध्ये USB-C तसेच 3.5mm ऑडिओ कनेक्टिव्हिटीची सुविधा आहे. बॉक्समध्ये हेडफोन, कॅरी केस, USB-C चार्जिंग केबल आणि 3.5mm-to-2.5mm ऑडिओ केबल मिळते. सुरुवातीला ब्लॅक आणि डेनिम रंग उपलब्ध असून पुढे व्हाइट, ब्रॉन्झ आणि लॅव्हेंडर रंग सादर केले जाणार आहेत.
MOMENTUM True Wireless 5 मध्येही बदलता येणार बॅटरी
MOMENTUM True Wireless 5 ईअरबड्समध्ये 7mm TrueResponse डायनॅमिक ट्रान्सड्यूसर्स देण्यात आले आहेत. हायब्रिड अॅडॅप्टिव्ह ANCसोबत ऑटोमॅटिक अँटी-विंड मोडही उपलब्ध आहे.
कॉलिंगसाठी 4-मायक्रोफोन अॅरे आणि 8-सेंसर सिस्टम देण्यात आली असून, यामध्ये व्हॉइस अॅक्सेलरोमीटर आणि AI आधारित स्पीच एक्स्ट्रॅक्शनचा समावेश आहे. Natural Transparency Modeमुळे गरजेनुसार आजूबाजूचे आवाजही ऐकता येतात.
कंपनीच्या दाव्यानुसार, ईअरबड्स एकदा चार्ज केल्यानंतर १२ तासांपर्यंत, तर चार्जिंग केससह एकूण ४० तासांपर्यंत वापरता येतात. ईअरबड्ससोबत चार्जिंग केसची बॅटरीही वापरकर्ता स्वतः बदलू शकतो. धूळ, घाम आणि पाण्याच्या शिंतोड्यांपासून संरक्षणासाठी त्यांना IP54 रेटिंग देण्यात आली आहे.
सेनहायझरने ईअरबड्ससाठी ग्रेफाइट, क्रीम, कॉपर, डेनिम आणि लॅव्हेंडर असे रंग उपलब्ध केले आहेत. कंपनीच्या या नव्या उत्पादनांमुळे प्रीमियम ऑडिओसोबत बॅटरी बदलण्याची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे.
(SDNA)