Monday, September 21

technology

ट्रेन धावली की वीज निर्माण होणार! रेल्वे रुळांच्या प्रत्येक कंपनात दडली ऊर्जा; वैज्ञानिकांनी शोधला भन्नाट उपाय
Natioanal, technology

ट्रेन धावली की वीज निर्माण होणार! रेल्वे रुळांच्या प्रत्येक कंपनात दडली ऊर्जा; वैज्ञानिकांनी शोधला भन्नाट उपाय

नवी दिल्ली। आतापर्यंत रेल्वे वीज वापरते, असे आपण पाहिले आहे; मात्र भविष्यात या समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. रेल्वे रुळांवरून ट्रेन धावताना निर्माण होणाऱ्या वजन, कंपन आणि हालचालींच्या ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारे तंत्रज्ञान वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. विशेष म्हणजे, या माध्यमातून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर रेल्वे रुळांची देखरेख करणारे छोटे सेन्सर आणि कमी वीज वापरणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालविण्यासाठी करता येऊ शकतो. ट्रेनच्या धक्क्यांमधील ऊर्जा आता वाया जाणार नाही! एखादी वजनदार ट्रेन रुळांवरून जात असताना रुळांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंपन तसेच वर-खाली होणारी हालचाल निर्माण होते. आतापर्यंत या ऊर्जेचा बहुतांश भाग वापरात येत नव्हता. नव्या तंत्रज्ञानामध्ये याच कंपनांना पकडून त्यांचे विद्युत ऊर्जेत रूपांतर केले जाते. म्हणजेच, प्रत्येक वेळी ट्रेन रुळांवरून धावेल, तेव्...