खातेदाराच्या निधनानंतर बँकेतील पैशांचे काय होते? नॉमिनीची नोंद असल्यास दावा प्रक्रिया सुलभ
मृत्यूनंतर खात्यातील रक्कम संपत नाही; आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर वैध दावेदाराला मिळू शकते रक्कम
नवी दिल्ली (SDNA) — बँक खात्यात जमा असलेली रक्कम खातेदाराच्या मृत्यूनंतर संपत नाही. खातेदाराच्या निधनानंतर खात्यातील शिल्लक रकमेवर वैध दावेदाराकडून दावा करता येतो. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अशा दाव्यांचा निपटारा अधिक सुलभ आणि वेळेत व्हावा यासाठी बँकांना आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर भावनिक धक्क्यासोबत अनेक प्रशासकीय प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. अशा वेळी बँक खाते, मुदत ठेव (FD) किंवा अन्य ठेवींमधील रक्कम मिळविण्याची प्रक्रिया स्पष्ट असल्यास कुटुंबीयांची मोठी गैरसोय टाळता येऊ शकते. त्यामुळे बँक खात्यात नॉमिनी अर्थात नामनिर्देशित व्यक्तीची नोंद करणे महत्त्वाचे मानले जाते.
नॉमिनीची नोंद असल्यास प्रक्रिया कशी होते?
खातेदाराने बँक खात्यात ...
