IIT-बॉम्बे प्रकरणात नवा ट्विस्ट; साहिलच्या वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात
मुलाच्या मृत्यूनंतर उपोषणासाठी पवई कॅम्पसकडे जात होते रवींद्र वाकोडे; प्रकरणाच्या तपासासाठी IIT-बॉम्बेकडून १० सदस्यीय समिती
मुंबई | २४ सप्टेंबर २०२६ (SDNA)
IIT-बॉम्बेतील बीटेकच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. मुलाच्या मृत्यूनंतर उपोषण सुरू करण्यासाठी IIT-बॉम्बेच्या पवई कॅम्पसकडे जात असलेले साहिलचे वडील रवींद्र वाकोडे यांना मुंबई पोलिसांनी गुरुवारी भांडुप परिसरात ताब्यात घेतले.
रवींद्र वाकोडे यांनी मुलाच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करत कॅम्पसमध्ये उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. साहिलचा १८ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता.
परीक्षा हॉलमधील CCTV फुटेज तपासाच्या केंद्रस्थानी
मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचच्या प्राथमिक तपासानुसार, १८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा ते पावणेएक या कालावधीत परीक्षा हॉलमधील साहिल...
